‘सोयरीक घराशी’ : चिंतनशील घरांच्या उन्नत नजरेसमोर भविष्यकाळातील सूर्योदय असतो; म्हणूनच त्यांच्या खांद्यावर ‘उद्याची घरं’ उभी राहू शकतात
प्रिय व्यक्तीसारखी घराचीही आस लागते. घर डोळ्यांना कधी दिसतंय असं होतं. घराच्या भिंती दमल्याभागल्या माणसांना त्यांच्या गुणावगुणांसकट पोटाशी घेतात. घर हे केवळ ऊब देणारं, सुखकर विश्रांतिस्थान नसतं. घरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप काही सोसावं लागतं. घरातल्या माणसांत बेबनाव झाला; घर दुभंगायची वेळ आली, तर घरावरही शोककळा येते. ते पोरकं दिसू लागतं.......